भुसावळमध्ये शासकीय ओपन स्पेसवर अतिक्रमण; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून नोटीस, १० एप्रिलला सुनावणी

Advertisement

भुसावळमध्ये शासकीय ओपन स्पेसवर अतिक्रमण; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून नोटीस, १० एप्रिलला सुनावणी

भुसावळमध्ये शासकीय ओपन स्पेसवर अतिक्रमण; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून नोटीस, १० एप्रिलला सुनावणी

​भुसावळ (प्रतिनिधी): शहरालगत असलेल्या सर्व्हे क्र. ११५/१/अ मधील शासकीय खुल्या जागेवर (Open Space) बेकायदेशीररित्या गोठा आणि गोडाऊन बांधून अतिक्रमण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
 याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच, भुसावळचे उपविभागीय अधिकारी (SDO) जितेंद्र पाटील यांनी संबंधित इसमाला नोटीस बजावली असून कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

​भुसावळ येथील जामनेर रोडवरील श्रद्धा नगर परिसरातील रहिवासी श्री. प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी १८ मार्च २०२६ रोजी ईमेलद्वारे प्रशासनाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, सर्व्हे क्र. ११५/१/अ मधील शासकीय मालकीच्या खुल्या जागेवर एका संस्थेने अतिक्रमण केले असून, त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे गोठा आणि गोडाऊन उभारण्यात आले आहे. या कामामुळे शासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

​या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी कार्यालयाने ३० मार्च २०२६ रोजी श्री. रवींद्र वामनराव तळेले यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये प्रशासनाने खालील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत:
​परवानगीचा पुरावा: संबंधित जागेवर बांधकाम करण्यासाठी कोणाकडून परवानगी मिळाली? याचे आदेश सादर करणे.

​कागदपत्रांची पडताळणी: बांधकामाशी संबंधित सर्व कागदपत्रे, परवाने आणि ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) घेऊन उपस्थित राहणे.
​खुलासा सादर करणे: या अतिक्रमणाबाबत आपले नेमके म्हणणे काय आहे, हे लेखी स्वरूपात मांडणे.
​१० एप्रिलला होणार 'दूध का दूध, पाणी का पाणी'
​या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी निश्चित केली आहे. या दिवशी संबंधित व्यक्तीने पुराव्यासह उपस्थित राहणे बंधनकारक आहे. जर विहित वेळी हजर न राहिल्यास, "संबंधित व्यक्तीला काहीही म्हणायचे नाही" असे गृहीत धरून प्रशासनाकडून अतिक्रमणावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
​शासकीय जागेवरील या अतिक्रमणामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, प्रशासन आता यावर काय कारवाई करणार, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या