प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांच्या समन्वयातून शहराचा विकास साधणार!
चोपडा: संदीप पाटील
चोपडा नगरपरिषदेच्या वतीने पत्रकार आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक वृद्धिंगत करण्यासाठी 'पत्रकार स्नेह मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहरातील नामवंत पत्रकार आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. रामनिवास झंवर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील उपस्थित होत्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन पाटील यांची देखील विशेष उपस्थिती लाभली.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असलेल्या पत्रकार बांधवांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने: श्री. आर. डी. पाटील,श्री. चंद्रकांत पाटील
श्री. संदिप पाटील ,श्री. राजेंद्र पाटील,श्री. आत्माराम पाटील श्री. मिलिंद सोनवणे ,श्री. संदिप ओली,श्री. पंकज पाटील श्री. नंदलाल मराठे यासह तालुक्यातील इतर पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.
मनोगत आणि चर्चा
कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार श्री चंद्रकांत पाटील व श्री. मिलिंद सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी पत्रकारितेसमोरील आव्हाने आणि प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा यावर प्रकाश टाकला. शहराच्या हितासाठी पत्रकार आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.
मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. रामनिवास झंवर आणि नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधताना शहराच्या विकासकामात माध्यमांच्या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले.
0 टिप्पण्या