भुसावळ :-
उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्या आदेशाची दीर्घकाळ अंमलबजावणी होत नसल्याने, प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसलेल्या एका त्रस्त नागरिकाने आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. भुसावळ येथील प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी आपल्या पत्नीसह १९ एप्रिल २०२६ पर्यत कारवाई न झाल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर 'खटिया टाको' (खाटा टाकून) उपोषण
आंदोलन दिनांक: २० एप्रिल २०२६ पासून (अतिक्रमण हटेपर्यंत).वेळ: सकाळी १०:०० वाजेपासून.
उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय, भुसावळ समोर करण्याचा अंतिम इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जागेवरील अतिक्रमण हटवण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच आदेश दिलेले आहेत. मात्र, प्रशासनाकडून या आदेशाची पायमल्ली होत असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या अन्यायाविरोधात वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने, अखेर श्री. पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
प्रमोद पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे की, ते सध्या त्वचारोगाच्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. उपोषणादरम्यान त्यांच्या प्रकृतीला काही इजा पोहोचल्यास किंवा काही बरे-वाईट झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी उपविभागीय अधिकारी (प्रांत साहेब) आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांची राहील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी अर्जासोबत आपले वैद्यकीय अहवालही (Medical Reports) जोडले आहेत.
"मी प्रशासनाला वारंवार विनंती केली आहे, पण आदेशाची अंमलबजावणी होत नाहीये. माझ्या आजारपणामुळे मला त्रास होत असतानाही, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मला पत्नीसह खाटा टाकून कार्यालयासमोर बसावे लागत आहे."
— प्रमोद जगन्नाथ पाटील (निवेदनकर्ते)
या आंदोलनाबाबत तहसीलदार, मुख्याधिकारी नगरपरिषद आणि पोलीस स्टेशन यांनाही माहितीसाठी प्रती रवाना करण्यात आल्या आहेत. आता प्रशासन १९ तारखेपर्यंत कारवाई करते की पाटील दाम्पत्याला उपोषणाला बसू देते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या