भुसावळ येथील 'माऊली प्लाझा'मधील अनधिकृत बांधकामावर कारवाईचे विभागीय आयुक्तांचे आदेश

Advertisement

भुसावळ येथील 'माऊली प्लाझा'मधील अनधिकृत बांधकामावर कारवाईचे विभागीय आयुक्तांचे आदेश

भुसावळ येथील 'माऊली प्लाझा'मधील अनधिकृत बांधकामावर कारवाईचे विभागीय आयुक्तांचे आदेश

​नाशिक/भुसावळ:
भुसावळ येथील सर्व्हे क्र. ११५/१/अ मधील 'ओपन स्पेस'वर झालेले अनधिकृत बांधकाम आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिल्डर व श्री समर्थ महिला बहुदेशीय संस्थेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी दिले आहेत. यासंदर्भात जिल्हा सह आयुक्त (न.पा.प्र.), जळगाव आणि मुख्याधिकारी, नगरपरिषद भुसावळ यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
​.            भुसावळ येथील रहिवासी श्री. प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडे या अनधिकृत बांधकामाविरोधात पाठपुरावा केला होता. त्यांच्या तक्रारीनुसार, माऊली प्लाझा अपार्टमेंटमध्ये खालील गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत:
​ओपन स्पेसचा गैरवापर: मोकळ्या जागेवर अनधिकृतरीत्या टिनशेड आणि सिमेंट गोदामाचे अतिक्रमण करण्यात आले आहे.
​नियमांचे उल्लंघन: इमारतीचे बांधकाम मंजूर नकाशाशी विसंगत असून, पार्किंगमधून बाहेर निघण्याचा रस्ता प्रत्यक्षात अस्तित्वात नाही.
​अनधिकृत मोबाईल टॉवर: अपार्टमेंटवर कोणत्याही परवानगीशिवाय मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे, जो हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
          ​श्री. पाटील यांनी १९ जानेवारी ते २६ मार्च २०२६ या कालावधीत वेळोवेळी दिलेल्या तक्रार अर्जांची दखल घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयाने हे पत्र निर्गमित केले आहे. सह आयुक्त नितीन पवार यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या पत्रात, सदर अतिक्रमण ३० दिवसांच्या आत हटवण्याबाबत आणि संबंधित दोषींवर दंडात्मक कारवाई करून सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
​.      तक्रारदार श्री. प्रमोद पाटील यांनी या प्रकरणात देवस्थानच्या आडोशाने होणारा संस्थेचा गैरकारभार आणि बिल्डरने केलेले व्यावसायिक अतिक्रमण यावर बोट ठेवले आहे. अपूर्ण पंचनाम्याची (दि. ०५/०२/२०२६) पुन्हा चौकशी व्हावी, अशीही त्यांची प्रमुख मागणी आहे.
​आता विभागीय आयुक्तांच्या या आदेशानंतर भुसावळ नगरपरिषद प्रशासन या अनधिकृत बांधकामावर काय आणि किती लवकर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या