सत्ताकारणाच्या धुमश्चक्रीत सामान्य माणूस आणि बळीराजा वाऱ्यावर; सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडला संताप
चोपडा/मुंबई:- पोलीसराज मिडिया
महाराष्ट्र राज्य एका बाजूला औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचे दावे करत असताना, दुसरीकडे राज्याच्या सामाजिक आरोग्याचे अत्यंत विदारक चित्र समोर आले आहे. देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी ४० टक्के
आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात होत असून, दररोज सरासरी १७ शेतकरी आपले जीवन संपवत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या भीषण परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते एस. बी. नाना पाटील यांनी 'सार्थ अभिमान... महाराष्ट्र राज्य प्रथम' अशा उपरोधिक शब्दांत संताप व्यक्त करत व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत.
सवयीचे मरण आणि 'इंचभर' जागा
काही वर्षांपूर्वी राज्यात दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या होत होत्या, तेव्हा त्या बातम्या पहिल्या पानावर झळकत होत्या. मात्र, आता ही संख्या १७ वर पोहोचली असताना, समाज आणि प्रशासन या मरणाला इतके सरावले आहे की, या बातम्या आता वर्तमानपत्राच्या कोपऱ्यातही दिसेनाशा झाल्या आहेत. "आम्ही मुर्दाड झालो आहोत, आम्हाला राजकारण आणि पैशाशिवाय काहीच दिसत नाही," असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्नाविना करपणारे आयुष्य
शेती परवडत नसल्याने ग्रामीण भागातील तरुणांना मुली मिळेनाशा झाल्या आहेत. ४० वर्षांपर्यंत लग्ने होत नसल्याने तरुण नैराश्यातून व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. एखादा शाळेचा शिपाई आपल्या मुलीचे लग्न थाटात करतो, मात्र १० एकर शेती असलेला मालक मुलाची शाळेची फी भरू शकत नाही, ही विषमता ग्रामीण भागात संघर्षाला आणि गृहकलहाला निमंत्रण देत आहे.
मुलींच्या तस्करीचा गंभीर प्रश्न
राज्यातून वर्षाला ११ हजार ६९७ मुलींचा तपास लागत नाही. बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येतही महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदू समाजाचे प्रमाण अधिक असल्याचे वास्तव मांडताना, यामागे केवळ सरकारी धोरणेच नव्हे तर धर्मातील काही जाचक चालीरीतीही जबाबदार असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
पोलिस कारवाई आणि सामाजिक स्वास्थ्य
पोलिसांकडून कुंटणखान्यांवर केल्या जाणाऱ्या कारवायांवरही या पोस्टमध्ये भाष्य करण्यात आले आहे. लग्ने न होऊ शकलेला शेतकरी तरुण हा या ठिकाणचा प्रमुख ग्राहक असून, या व्यवस्थेमुळेच समाजाचे उरलेसुरले स्वास्थ्य टिकून आहे, असे खळबळजनक विधान पाटील यांनी केले आहे. अशा ठिकाणांना पोलीस संरक्षण मिळायला हवे, जेणेकरून तिथे होणारी गुंडगिरी थांबेल, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विद्येविना मती गेली, पण शिक्षणाने काय दिले?
महात्मा फुलेंच्या 'विद्येविना मती गेली' या उक्तीचा आधार घेत, आजच्या शिक्षण पद्धतीवरही टीका करण्यात आली आहे. "शिक्षणाने केवळ अक्षर ओळख झाली, पण मतीची घागर रिकामीच राहिली," अशा शब्दांत आजच्या तरुण पिढीच्या लाचार मानसिकतेवर प्रहार करण्यात आला आहे. बाप लुटला जात असतानाही ही पिढी आरत्या गाण्यात मग्न आहे, ही सर्वात मोठी शोकांतिका असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी आणि विरोधक रोजच्या राजकारणात मग्न असताना, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील हे 'मरण' थांबणार कधी? असा जळजळीत प्रश्न आता विचारला जात आहे.ण

0 टिप्पण्या