दिव्यांग सेना जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप!

Advertisement

दिव्यांग सेना जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप!

दिव्यांग सेना जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप!

जळगाव:पोलीसराज मिडिया

दिव्यांग सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रसाद साळवी सर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये नूतन तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. याच पार्श्वभूमीवर दिव्यांग सेना जळगाव जिल्ह्याच्या वतीने देखील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते अधिकृत नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.


​जळगाव जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, उपाध्यक्ष शेख शकील, जिल्हा सल्लागार राहुल कोल्हे, गणेश पाटील, जितेंद्र पाटील आणि ज्येष्ठ कवी किशोर नेवे (काका) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते हे नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

नवनियुक्त पदाधिकारी खालीलप्रमाणे:

  • भुसावळ तालुका: करुणा सातदिवे (तालुका अध्यक्ष), शशिकांत रायमळे (उपाध्यक्ष)
  • भुसावळ शहर: दिनेश मोची (शहर अध्यक्ष)
  • रावेर तालुका: भगवान कोळी (तालुका अध्यक्ष), निलेश खाचणे (उपाध्यक्ष), पराग वारके (तालुका सचिव)
  • सावदा शहर: तुषार जैन (शहर अध्यक्ष)
  • चोपडा तालुका: अनिल पाटील (तालुका अध्यक्ष), आत्माराम पाटील (उपाध्यक्ष)
  • संभाजीनगर जिल्हा: सोमनाथ जगताप (जिल्हा अध्यक्ष)

जिल्ह्यात एकही दिव्यांग बांधव योजनेपासून वंचित राहणार नाही: जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन

​या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांनी दिव्यांग सेनेच्या कार्याचा आणि विस्ताराचा आढावा घेतला. ते म्हणाले, "दिव्यांग सेनेने जळगाव जिल्ह्यात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रत्येक तालुक्यात आणि ग्रामीण भागात दिव्यांग बांधवांसाठीचा ५% कल्याणकारी निधी मिळण्याबाबत संघटनेने प्रशासनाला निवेदने दिली, मोर्चे काढले आणि त्यात यशही मिळवून दाखवले. यापुढे जळगाव जिल्ह्यात एकही दिव्यांग बांधव शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मी देतो."

​तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना, दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी व न्यायासाठी सदैव तत्पर राहून संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प जाहीर केला.

​या महत्त्वपूर्ण सोहळ्याला जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विशाल दांडगे, यावल तालुका अध्यक्ष योगेश चौधरी, सचिव चेतन तळेले, जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा संघटक खेमराज कोळंबे, जामनेर तालुका अध्यक्ष रमजान तडवी, समाधान पाटील, राजेंद्र ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या