ढंगाणे येथील महादेव मंदिरासाठी तांब्याचा शेपनाग व मणी भेट...

Advertisement

ढंगाणे येथील महादेव मंदिरासाठी तांब्याचा शेपनाग व मणी भेट...

 ढंगाणे येथील महादेव मंदिरासाठी तांब्याचा शेपनाग व मणी भेट...


संदिप पाटील, चोपडा
चोपडा (प्रतिनिधी)  :- ढंगाने ता. जि. धुळे येथे उद्या सोमवारी महादेव मंदिरात महादेवाची पिंडाची प्राणप्रतिष्ठा होणार असून. आज संध्याकाळी ४ वाजता महादेवाची पिंडाची वाजतगाजत भव्य मिरवणूक निघणार आहे.

दरम्यान चोपडा वन विभागाचे वनक्षेत्रपाल बी. के. थोरात साहेबांनी तांब्याच्या शेषनाग मणी व चोपडा तालुक्यातील पत्रकार यांनी फुल नाही फुलाची पाकडी म्हणून पितळाची पंचाआरती भेट म्हणून ढंगाने येथील उपसरपंच प्रविण पाटील व सामाजिक कार्यकर्ते योगेश जयराम पाटील यांच्या कडे काल सोनगीर येथे सुपूर्द करण्यात आली. यामुळे चोपडा वन विभागाचे वन क्षेत्रपाल बी. के. थोरात साहेबांचे धुळे जिल्ह्यातील  नगाव गृप ग्राम पंचायतचे सरपंच ज्ञानज्योती भदाणे, उपसरपंच प्रविण अहिरे, सर्व ग्राम पंचायत सदस्य आणि विशेषतः ढंगाने गावातील नागरिकांनी आभार मानले. कारण जळगाव जिल्ह्यातील चोपडा वन विभागात  कार्यरत असलेले वनक्षेत्रपाल बी .के. थोरात साहेब हे देखील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील रहिवासी असल्याने त्यांनी आपल्याच जिल्ह्यातील ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन फुल नाही फुलाची पाकडी म्हणून योगदान दिले आहे. उद्या सकाळी महादेवाची पिंडाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरि सर्व भाविकांची याचा लाभ घ्यावा. असे आवाहन ढंगाने गावातील ग्रामस्थांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या