मंदीराच्या नावाखाली विजचोरी? तीन वर्षांपासून सर्रास वापर; महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त,काय कारवाई होईल याकडे नागरिकांचे लक्ष

Advertisement

मंदीराच्या नावाखाली विजचोरी? तीन वर्षांपासून सर्रास वापर; महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त,काय कारवाई होईल याकडे नागरिकांचे लक्ष

 मंदीराच्या नावाखाली विजचोरी? तीन वर्षांपासून सर्रास वापर; महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त,काय कारवाई होईल याकडे नागरिकांचे लक्ष 


​[पोलीसराजमिडिया], प्रतिनिधी: संदिप पाटील 

धार्मिक स्थळांच्या नावाखाली विजेचा गैरवापर करण्याचे प्रकार समोर येत असतानाच, गजानन महाराज मंदिरातून बेकायदेशीरपणे वीज खेचून तिचा मंदिरातील पोळ्या बनविण्याच्या मशीन साठी आणि घरगुती वापर होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, तक्रार करूनही प्रशासन कारवाई का करत नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.


​काय आहे नेमकं प्रकरण?

​प्रमोद जगन्नाथ पाटील या भुसावळ शहरातील श्रद्धा नगर भागातील माऊली प्लाझा येथील स्थानिक रहिवाशी असल्याने अपार्टमेंट मालक यांच्या तीस-या  मजल्यावरील रहिवाशी रवींद्र वामन तळेले यांच्या मालकीच्या घरात अनाधिकृत वीज वापर पकडण्यात आला  यासंदर्भात गंभीर तक्रार केली आहे. त्यांच्या फ्लॅटला लागूनच मंदिरातून आलेली विजेची वायर गेली आहे. या वायरद्वारे खालील प्लॉटमध्ये मोठी मशिनरी चालवून व्यावसायिक वापर केला जात आहे, तर वरील मजल्यावर घरगुती वापर सुरू आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असून याचे व्हिडिओ चित्रीकरण (पुरावे) तक्रारदाराकडे उपलब्ध आहेत.अशी माहीती प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी दिली.


​'पाणी कुठेतरी मुरतंय?' - प्रशासनावर गंभीर आरोप

​या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, तक्रारदार पाटील यांनी यापूर्वी संबंधित अधिकारी श्री. कवटे साहेब यांच्या निदर्शनास हा सर्व प्रकार आणून दिला होता. मात्र, अनेक दिवस उलटूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. "पुराव्यानिशी तक्रार देऊनही कारवाई का होत नाही? यामध्ये प्रशासनाचे साटेलोटे आहे का?" असा थेट सवाल पाटील यांनी उपस्थित केला असून, यात 'पाणी कुठेतरी मुरत असल्याचा' आरोपही त्यांनी केला आहे.

तक्रारदाराचा इशारा

​"जर स्थानिक पातळीवर तात्काळ दंडात्मक कारवाई झाली नाही, तर मला वरिष्ठ कार्यालयाकडे धाव घ्यावी लागेल," असा इशाराही प्रमोद पाटील यांनी दिला आहे. मंदीराच्या पवित्र नावाचा वापर करून विजेची चोरी करणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या