भुसावळ: 'माऊली प्लाझा' बेकायदेशीर बांधकाम प्रकरण;​युवा गुर्जर महासभेचा पाठिंबा; २६ जानेवारी २०२६ च्या मुहूर्तावर आंदोलनाचे रणशिंग

Advertisement

भुसावळ: 'माऊली प्लाझा' बेकायदेशीर बांधकाम प्रकरण;​युवा गुर्जर महासभेचा पाठिंबा; २६ जानेवारी २०२६ च्या मुहूर्तावर आंदोलनाचे रणशिंग

भुसावळ: 'माऊली प्लाझा' बेकायदेशीर बांधकाम प्रकरण;
युवा गुर्जर महासभेचा पाठिंबा; २६ जानेवारी २०२६ च्या मुहूर्तावर आंदोलनाचे रणशिंग

जळगाव: पोलीसराज मिडिया 
भुसावळ शहरातील बहुचर्चित 'माऊली प्लाझा' इमारतीमधील बेकायदेशीर बांधकामाचा वाद आता जिल्हा प्रशासनाच्या दारात पोहोचला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि सखोल चौकशीच्या मागणीसाठी आज, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री. प्रमोद जगन्नाथ पाटील आणि सौ. संगीता प्रमोद पाटील या दाम्पत्याने जळगाव येथील जी.एस. ग्राउंडवर (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

युवा गुर्जर महासभेचा मैदानात पुढाकार
​या आंदोलनाला आता सामाजिक संघटनांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेचे प्रदेशाध्यक्ष श्रीरामबापूसाहेब पाटील यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह उपोषण स्थळी भेट देऊन या लढ्याला संघटनेचा जाहीर पाठिंबा घोषित केला. श्रीरामबापूसाहेब पाटील हे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन या विषयावर चर्चा करणार असून, प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रशासनावर दबाव वाढला
​आज २६ तारीख आणि २०२६ हे वर्ष असा विशेष योगायोग साधत पुकारलेल्या या आंदोलनामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमांची लगबग सुरू असतानाच, न्यायासाठी उपोषणाला बसलेल्या या दाम्पत्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. आता जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या